loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात एक अनोखा उपक्रम, नातीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला मदत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - स्वर्गीय कैलासवासी तातोबा उर्फ काका महादेव डोर्ले यांच्या स्मरणार्थ तसेच युगा प्रसाद डोर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा लांजात समाजोपयोगी उपक्रम राबवत एक आदर्श घालून देण्यात आला आहे. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात स्वर्गीय तातोबा उर्फ काका डोर्ले यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ते न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे माजी अध्यक्ष होते. तर नुकतेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सामाजिक कार्याचा मार्ग निवडण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने लांजा शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा क्र.५ ला भाषण मंच (डायस/पोडियम) देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा हा पोडियम शाळेतील पालक-शिक्षक सभा, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार असून ही देणगी सोसायटी मेडिकलच्या वतीने देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांजली कुरूप यांनी सोसायटी मेडिकलचे प्रसाद डोर्ले यांचे आभार मानले. तसेच शाळेत आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमा दरम्यान प्रसाद डोर्ले व त्यांचा पत्नीचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना निश्चितच चालना मिळेल, तसेच समाजातून शाळांना अशा प्रकारे सहकार्य मिळणे ही सकारात्मक बाब असल्याची भावना शिक्षक वर्गातून व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg