loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वै. सद्गुरु ह.भ.प. लेले महाराज याच्या कृपेने श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ व संत जनाबाई महिला मंडळ (जांभुर्णेवाडी) जामसुत यांच्यावतीने हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव दि. १ एप्रिल ते दि. ३ एप्रिल २०२६ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ वा. अभिषेक वीणापूजन व वै. गुरुवर्य ह.भ.प. लेले महाराज यांचा समाधी सोहळा व श्री राम जप, सकाळी ९ वा.जांभुर्णेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या सहयोगातुन स्वखर्चातून बांधलेल्या नविन पाण्याच्या टाकीचे उ‌द्घाटन, सकाळी १० ते दुपारी ३ वा. भव्य रक्तदान शिबीर, सायं. ७ ते ९ वा. किर्तन ह.भ.प. बापू महाराज नाडे (पाटण) यांचे हरिकिर्तन, रात्रौ १० नंतर संगीत भजन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. २० मि. हनुमान जन्मकाळ, सकाळी ७ ते १० वा.पादुका पालखी मिरवणुक, सकाळी १० वा. श्रीसत्यनारायण महापुजा, दुपारी २ वा.संत जनाबाई महिला मंडळ जांभुर्णेवाडी हळदी कुंकू समारंभ, सायं. ७ ते ९ वा. किर्तन - ह.भ.प. मुक्ताताई नारायण महाराज पवार (अनारी) यांचे हरिकिर्तन, रात्री. १०.३० नंतर, जांभुर्णेवाडीचा बहारदार कार्यक्रम, शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० वा. ह.भ.प. गणेश महाराज शिगवण (खेड) यांचे काल्याचे किर्तन, सकाळी १० ते १२ वा.श्री सत्यनारायण महापूजा विसर्जन व कार्यक्रम समारोप, दुपारी १२ नंतर काल्याचा महाप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक, श्री संत गोरोबाकाका नेवा मंडळ व संत जनावाई महिला मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg