देवळे (प्रकाश चाळके) - निसर्गाच्या कृपेमुळे यावर्षी आंबा काजूच्या उत्पादनात भयानक घट झाली. उष्णता आणि पाऊस या कात्रीत सापडलेला शेतकरी सरकारच्या मदतीच्या व आश्वासनांच्या आधाराची वाट पाहत होता. परंतु सरकारने कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. कारण हेक्टरी 22 हजार याचा अर्थ प्रत्येक कलमामागे 220 रुपये हा निकष सरकारने लावला असेल तर याचा ताळेबंदाने लेखाजोखा करणारी यंत्रणा कोण होती. असा सवाल कोकणी माणसाने विचारला असून ही कोकणी माणसाची केलेली चेष्टा आहे की मदत? कोकणी माणसाने आंबा काजू बाबत कधीही तक्रार केली नव्हती येईल ते उत्पन्न आणि मिळेल तो पैसा या तत्त्वावर आज पर्यंत कोकणातील शेतकरी चालला. नुकसान झाले म्हणून आत्महत्येचे हत्यार कधीही कोकणी माणूस उचलत नाही असे असतानाही सरकार कुणाचंही असो परंतु नेहमीच कोकणी माणसावर अन्याय का केला जातो. असेच कोकणातील शेतकरी म्हणत आहे.
कोकणी माणसाला हेक्टरी रु. 22000 ही सरकारकडून मिळणारी मदत ही मदत नसून प्रत्येक कलमाला 220 रुपयाचा चुना लावला आहे. असे मत कोकणी लोकांनी व्यक्त केले आहे. साहेब आंब्याच्या एका वर्षाच्या कलमाला नर्सरीतून खरेदी करताना 300 (तीनशे) रुपये मोजावे लागतात. आणि त्याची देखभाल करायला दहा ते बारा वर्षे लागतात त्यावेळी त्याला फळधारणा होते. आणि त्यापुढे उत्पन्न मिळते परंतु निसर्गाने अवकृपा केली तर हाता तोंडाशी आलेले उत्पन्नही निघून जाते .त्याचा प्रत्यय यावर्षी कोकणी शेतकऱ्यांना आला. शासनकर्त्यांनो तुम्ही देत असलेली रु.220 ही मदत त्यात आंब्याचं साध कलम विकत घेता येणार नाही. एवढी आहे हे तुम्हाला सांगणार कोण ? असा सवाल कोकणी शेतकऱ्याने केला आहे. कोकणातील आंबा काजू बागायतदार कधीतरी नुकसान झाले तर बोंबाबोंब करतात आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारकडे याचना करतात . मात्र सरकार असा 220 रुपयांचा चुना लावेल असं कोकणी शेतकऱ्याला कधीही वाटलं नव्हतं.
अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला शासन काहीतरी मदत करेल आणि मार्च पर्यंत आपल्या खात्यात काहीतरी पडेल या आशेवर असणारा शेतकरी आज कपाळाला हात लावून बसला आहे. शासनाने अक्षरशः कोकणी शेतकऱ्याच्या जखमेवर 220 रुपयाचे चुन्या ऐवजी मीठच चोळले आहे की काय असा सवाल कोकणी शेतकऱ्यांना पडला आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असलं तरी नेहमीच कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो असे बोलले जाते मात्र त्याची प्रचिती आंबा काजूच्या दोनशे वीस रुपयांची मदत करून सरकारने शिक्का मोर्तबच केली असल्याचे कोकणी शेतकरी म्हणत आहे. शासन कर्त्यांना आंबा काजूचा नुकसान भरपाईचा लेखाजोख नेमका कोणत्या यंत्रणेकडून केला गेला. आणि 220 रुपयांची मदत द्यावी असे मत मांडले गेले त्यांचा कोकणी माणसाकडून सत्कार करावा का असा शेतकरी वर्गातून चर्चेचा विषय आहे.












1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.