loader
Breaking News
Breaking News
Foto

कामे जुनी, निविदा नव्या! पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना झापले

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिकेतील रखडलेली कामे आणि प्रशासकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे शिवसेना-भाजप नगरसेवकांची आणि पालिका अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. ​प्रशासकीय कालावधीत शहरात काही कामे पूर्ण झाली आहेत, मात्र त्या कामांना आताच्या जनरल सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. "जी कामे आधीच पूर्ण झाली आहेत, त्यांना आता मंजुरी कशी द्यायची?" असा पेच नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर होता. या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली होती. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले की, तुमच्या काळात झालेली कामे तुम्ही तुमच्या स्तरावर निकाली काढा, त्यासाठी नगरसेवकांना अडचणीत आणू नका.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पालकमंत्र्यांनी नगरसेवकांनाही स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. पालिकेची आर्थिक स्थिती सध्या बेताची असल्याने कोणत्याही अवाजवी खर्चाला मंजुरी देऊ नका, असे त्यांनी बजावले. इतकेच नाही तर, पालिकेच्या पैशातून होणारे अभ्यास दौरे सध्या पूर्णपणे बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. "आधी पालिकेची आर्थिक स्थिती सुधारा, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा आणि मगच खर्चाच्या विषयांकडे वळा," असा सल्लाही त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg