loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील ज्योतिबा मंदिरात उद्या चैत्र पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी - रत्नागिरीतील पेठ किल्ला येथील प्रसिद्ध श्री ज्योतिबा मंदिरात गुरूवारी 2 एप्रिल रोजी श्री कुलस्वामी ज्योतिबाचा चैत्र पौर्णिमा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. रत्नागिरीतील पेठ किल्ला येथे असलेले श्री ज्योतिबा मंदिर हे प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. वर्षभर या मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. चैत्र पौर्णिमा उत्सवही प्रतिवर्षी अतिशय उत्साहात साजरा होत असतो. यावर्षी 2 एप्रिल 2026 रोजी हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात सकाळी 10 वा. कुलदेवतेची पुजा आणि विडे भरण्याचा कार्यक्रम होईल. सकाळी 11 वा. आरती, मंत्रपुष्प, प्रार्थना आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलं आदी कार्यक्रम संपन्न होतील. दुपारी 12 वा. ज्योतिबा सेवा मंडळाची सर्व साधारण सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. पारंपारिक गोंधळ सादर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरूवार दिनांक 2 एप्रिलला साजर्‍या होत असलेल्या या उत्सवासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत, श्री मंगलमुर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, स्थानिक नगरसेवक बंटी कीर, स्थानिक नगरसेविका निवेदीता कळंबटे आदी मान्यवरांचा समावेश आहे. 2 एप्रिलला होणार्‍या या उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांचा तसेच देवाच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री ज्योतिबा मंदिर समितीचे अध्यक्ष जेष्ठ नेते नगरसेवक श्री. राजन शेट्ये, उपाध्यक्ष श्री अजय गांधी, सरचिटणीस श्री. सचिन गांधी, सदस्य अमोल गांधी, सदस्य विरेंद्र वंणजू यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg