loader
Breaking News
Breaking News
Foto

हनुमान जयंती निमित्त पिरावाडी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - श्री हनुमान मंदिर न्यास व श्री तरुण संघ दक्षिण वाडा आचरे पिरावाडी यांचे वतीने पिरावाडी-दक्षिणवाडा येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री हनुमान मंदिर न्यास पिरावाडी दक्षिणवाडाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ आदर्श व्यापारी संघटना आचरा चे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर हनुमान मंदिर न्यास चे अध्यक्ष गिरीधर सारंग, सचिव दत्तकुमार धुरी, तरुण संघ दक्षिणवाडाचे अध्यक्ष दीनानाथ धुरी तसेच मुरलीधर कोळंबकर, नरेंद्र कोळंबकर, सतीश खवणेकर, वासुदेव कमळे, नित्यानंद तळवडकर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष नारायण कुबल, विठ्ठल धुरी, डॉ प्रमोद कोळंबकर, रामचंद्र कुबल, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, आग्रह हॉटेलचे सुरेंद्र कुबल आदींसह श्री हनुमान मंदिर न्यास व श्री तरुण संघ-दक्षिणवाडा चे सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी राज्य स्तरावर नाट्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलेले सतीश खवणेकर यांचाही मंडळातर्फे सन्मान केला गेला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg