loader
Breaking News
Breaking News
Foto

जयगड बंदरात थरारक ‘मिडनाईट ऑपरेशन’

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदर च्या समुद्रात काल मध्यरात्री एक थरारक आणि धाडसी कारवाई पार पडली—ज्यात मत्स्यव्यवसाय विभागाने अवैध LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना अक्षरशः रंगेहाथ पकडले. काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती की रात्रीच्या अंधारात LED लाईटचा वापर करून काही प्रमाणात अवैध मासेमारी सुरू आहे. गस्ती नौकेसाठी डिझेल उपलब्ध नसल्यामुळे हे मासेमार निर्धास्त झाले होते. मात्र, विभागाने शांतपणे रणनीती आखत अचानक डिझेलची व्यवस्था केली आणि कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगड बंदरात हलवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गडद अंधार, जोरदार वारे आणि उग्र समुद्री लाटा—अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५ परवाना अधिकारी आणि सुरक्षा पथकाने समुद्रात धडक दिली. या धाडसी पथकात चिन्मय जोशी (परवाना अधिकारी रत्नागिरी), पार्थ तावडे (परवाना अधिकारी साखरीनाटे), स्वप्नील चव्हाण (परवाना अधिकारी गुहागर), दीप्ती साळवी (परवाना अधिकारी दाभोळ), स्मितल कांबळे (परवाना अधिकारी जयगड) तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार व साईनाथ साळवी यांचा समावेश होता. ही संपूर्ण कारवाई मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी, सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली. समुद्राच्या मध्यभागी अचानक धाड टाकत पथकाने अवैध LED लाईटने मासेमारी करणाऱ्या ३ नौकांना वेढा घातला. याच दरम्यान, एक नौका कारवाईची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, विभागाच्या पथकाने हार न मानता उग्र समुद्री परिस्थितीत तब्बल १ तास पाठलाग (high-speed chase) करत अखेर त्या नौकेला पकडले—ही कारवाई मोहिमेतील सर्वात थरारक क्षण ठरली.

टाईम्स स्पेशल

जप्त करण्यात आलेल्या नौका - IND-MH-4-MM-1961 – H. Imtiyaz मालक – इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम, IND-MH-4-MM-506 – Lakshmi मालक – लीना लक्ष्मण बिरजे, IND-MH-4-MM-1971 – Aqsa Imran मालक – अब्दुल लतीफ अली होडेकर, तीन्ही नौका जयगड बंदरात आणून तात्काळ जप्त करण्यात आल्या. अत्यंत धोकादायक हवामान, समुद्रातील प्रचंड प्रवाह आणि अंधार—या सर्व अडथळ्यांवर मात करत एका रात्रीत तीन नौका पकडण्याची ही कारवाई म्हणजे विभागासाठी एक रेकॉर्डब्रेकिंग ऑपरेशन ठरली आहे. सदर प्रकरणांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (MMFRA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून, मा. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायनिर्णयासाठी प्रकरणे सादर केली जाणार आहेत. यासह, गस्ती नौका व ड्रोनच्या साहाय्याने रत्नागिरी जिल्ह्याने अवैध मासेमारीविरोधात राज्यात सर्वाधिक कारवाया करत आघाडी घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg