loader
Breaking News
Breaking News
Foto

​कोल्हापुरात ३१ मार्चपासून 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'चे आयोजन

​कोल्हापूर : श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पुणे येथील 'एकत्वम इन्फ्रा' यांच्यामार्फत केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या महाकुंभामध्ये देशातील १७ राज्यांतील २०० हून अधिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक प्राप्त कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टेराकोटा, मातीची ज्वेलरी, बांबू काम, लेदर वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, पैठणी, बनारसी जरदोशी साड्या आणि लाकेच्या बांगड्या यांसारख्या विविध हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

​पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देऊन तरुणांनी छोटे उद्योग सुरू करावेत, या उद्देशाने आय.टी.आय., पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात पाचारण करण्यात आले आहे. या निमित्ताने देशभरातील कारागिरांच्या कलेचा गौरव होणार असून, कोल्हापूरकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg