सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दोन दशके सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'अटल प्रतिष्ठान'च्या अध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सेकर यांची आगामी पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, कार्यवाहपदी रघुनाथ तानावडे यांची निवड झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेने २००५ मध्ये स्थापन झालेल्या या न्यासाने जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. निवडीनंतर बोलताना ॲड. पार्सेकर यांनी पुढील पाच वर्षांचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले की, "पुढील काळात पर्यावरण, करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगारावर आमचा विशेष भर असेल. विशेषतः जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांसाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे."
अशी आहे नवीन कार्यकारिणी- अध्यक्ष: ॲड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष: डॉ. राजशेखर कार्लेकर, श्रीकांत राऊळ, कार्यवाह: रघुनाथ तानावडे, सहकार्यवाह: ॲड. अनुराधा परब, खजिनदार: अर्पिता वाटवे, कार्यकारणी सदस्य: विक्रम कोटणीस, प्रसाद महाले, मानसी परब, जितेंद्र पंडीत, बाळकृष्ण लिंगवत. कायम निमंत्रित सदस्य: डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. राजशेकुमार गुप्ता, प्रशांत सावळ, सुजाता पडवळ, पुंडलिक दळवी, राजाराम पार्सेकर, सुस्मिता चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ॲड. पार्सेकर यांनी गेल्या २० वर्षांतील प्रवासात सहकार्य करणाऱ्यांना धन्यवाद दिले.






































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.