loader
Breaking News
Breaking News
Foto

मालमत्ता कर भरण्याचे पनवेल महापालिकेचे आवाहन, 157 मालमत्तांवर अटकावणी कारवाई

कळंबोली : मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख असून महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सन 2025–2026 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. महापालिकेची दिनांक 29 मार्च 2026 पर्यंत एकूण मागणी 2289.73 कोटी रुपये इतकी असून, दिनांक 01 एप्रिल 2025 ते 29 मार्च 2026 रोजी पर्यंत एकूण वसुली 682.53 कोटी व शिल्लक 1606.32 कोटी आहे. थकित मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वसुली वाढविण्यासाठी १३ स्वतंत्र वसुली पथके कार्यरत करण्यात आली आहेत. थकबाकीदारांना प्रत्यक्ष भेट देऊन नोटीस वितरण व जप्ती (अटकावणी) कारवाई करण्यात येत आहे. दिनांक 28 मार्च 2026 पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईनुसार कामोठे, कळंबोली, खारघर, पनवेल, उपविभाग नावडे या नोडमध्ये एकूण 1716 नोटिसा बजावण्यात आल्या असून 157 अटकावणी कारवाया करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास 2% सवलत देण्यात येत आहे. नागरिकांनी panvelmc.org या संकेतस्थळावरून सहजपणे कर भरता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी KARMITRA App व Panvel Connect App उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली आहे. अटकावणीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर धारकांनी वेळेत भरावा व महापालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg