रत्नागिरी : उपनगरध्यक्ष समिर तिवरेकर यांना कार्यालयात शिविगाळ केल्या प्रकरणी बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या कृत्याबद्दल जाहीर माफी मागीतली. पालिकेच्या इतिवृत्तामध्ये याची नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सामाजिक संस्थाना विचार करून निधी देण्याचा निर्णय झाला. त्याला अनुसरून सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापनावर प्रशिक्षणाचा ठराव देखील स्थगित ठेवला. गेली अठरा वर्षे रखडलेल्या परटवणे साई मंदिर येथील अपूर्ण पूल सुरू करण्यासाठी खासगी जागा मालकांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्याबाबत सभागृहात एकमत झाले.
पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षते खाली झाली. सुरवातीलाच सुर्वे यांनी शहरातील घनकचऱ्याचे पूर्ण निर्मुलन करायचे आहे. प्लास्टिक पिशव्यांचा अतिरिक्त वापर होत आहे. शहर प्लास्टीक मुक्त करण्यावर भर द्यायचा आहे. यासाठी पर्यावरण पुरक पिशव्या नागरिकांनी वापराव्या. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विषय पुत्रिकेवरील विषयावर चर्चा सुरू झाली. बहुतेक विषय चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. परंतु काही विषयांवर चांगलीच चर्चा झाली. उद्यान विभागाला साधनसामग्री खरेदीसाठी २० हजार रुपये अग्रीम मिळावे, यासाठी ठराव घेण्यात आला. हा स्थायी समितीचा विषय आहे. सर्वसाधारण सभेत कशाला आणला, असे राजू तोडणकर यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया इनस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वेस्ट मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर तर्फे नागरी सुविधा वितरण व लोकप्रतिनिधीच्या जबाबदाऱ्या यावर सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापनावर प्रशिक्षण होण्याबाबत सभागृहापुढे ठराव आला.
परंतु पालिकेची परिस्थिती पाहुन तो स्थगित ठेवला. शहरातील सामाजिक संस्थाना पालिकेकडुन अनुदान देण्यात येणार होते. यावरही चर्चा झाली आणि पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनुदान देण्याचा निर्णय झाला. शहारत चार सुरक्षा गार्डची नियुक्ती केली आहे. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडुन ही नियुक्ती झाली असून पालिका त्याला पगार देते. परंतु हे सुरक्षा गार्ड कुठे दिसतच नाही, असा आरोप भाजपाने केला. त्यामुळे यापुढे त्यांनी त्या भागातील नगरसेवकाशी संपर्क ठेवावा, असे स्पष्ट केले. परटवणे येथील पूर १८ वर्षापासून अपूर्ण आहे. तो सुरू करण्यासाठी त्याला लागणारा समाव रस्त्यासाठी वैद्य यांच्या खासगी जागेतून करावा लागणार आहे. वैद्य यांनी या जागेसाठी बाजारभावाप्रमाणे जमिनीचा दर मागितला आहे. त्यांच्या दोन जगांपैकी कोणतीही एका जागा देण्यास ते तयार आहेत.






























.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.