मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई न झाल्यास खाडी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा तळाशील ग्रामस्थांनी दिल्यावर महसूल विभागाने वाळू उपशावरील कारवाईसाठी तीन पथके नेमून कारवाईचां इशारा दिल्याने वाळू उपसा बंद असला तरी खाडी पात्रात उभ्या करून ठेवलेल्या वाळू काढण्याच्या नौका वं इतर साहित्य जोपर्यंत हटविले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, अशी भूमिका आज तळाशील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आली.
मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये, अशा मागण्या तळाशील ग्रामविकास मंडळातर्फे तळाशील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या. सदर वाळू उपसा बंद न झाल्यास ३० मार्च रोजी खाडी पात्रात उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही ग्रामस्थानी दिला होता. या इशाऱ्यानंतर मालवण तहसीलदारांनी कालावल खाडी पात्रातील अनधिकृत वाळू उपशाला आळा घालण्यासाठी दि. २५ मार्च पासून स्थिर पथके नेमून अनधिकृत वाळू उपसा होताना दिसून आल्यास संबंधितांवर फौजदारी व दांडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या खाडीतील वाळू उपसा काही काळ बंद झाला होता.
दरम्यान याबाबत तळाशील येथील गोपाळकृष्ण मंदिरात ग्रामस्थांची बैठक पार पडली. तहसीलदारांच्या इशाऱ्यानंतर कालावल खाडी पात्रात काही काळ वाळू उपसा बंद झाल्याचे दिसत असले तरी वाळू काढणाऱ्या नौका खाडी पात्रातच उभ्या असल्याने त्यांच्याकडून पुन्हा वाळू उपसा होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या नौका खाडीपत्रातून हटवाव्यात अशी मागणी या बैठकीत ग्रामस्थांनी करत जोपर्यंत खाडीपात्रातील वाळू काढणाऱ्या नौका हटविल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करण्यावर ठाम राहणार असल्याची भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली, अशी माहिती तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांनी दिली.












































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.