संगलट खेड (प्रतिनिधी) : दापोली-खेड रस्त्यावरील वाकवली नजीक असलेल्या उन्हावरे फाट्याजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास उन्हावरे फाटा, वाकवली येथे हा अपघात घडला. नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव बौद्धवाडी, ता. दापोली) आणि त्यांचा मित्र अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड, ता. दापोली) हे दोघे चॉकलेट रंगाच्या अॅक्टिव्हा गाडीने (क्र. MH 08 BF 3766) प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर आदळून भीषण अपघात झाला.
नरेश रुके हे वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांचे चुलत भाऊ नितेश तांबे यांनी पहाटे ५:०० च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी दुचाकीचा पुढचा आणि पाठीमागील भाग पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत आढळला. नरेश रुके आणि अमित माने हे दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नरेश चंद्रकांत रुके यांना पहाटे ५:०५ वाजता मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेले अमित माने यांना पुढील उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 'फेटल मोटार अपघात' (रजि. नं. ०६/२०२६) म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार बुरोंडकर (बक्कल नं. ६९७) करत आहेत. या घटनेमुळे जालगाव आणि दापोली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.











1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.