loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

खेड (दिलीप देवळेकर) - खेड शहरातील कुवार साई परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली. आग वेगाने पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः ही आग जवळील घरांच्या दिशेने सरकत असल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भाजपचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांना फोनद्वारे दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ॲड. वैभव खेडेकर यांनी तत्काळ खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि त्वरित मदत पाठविण्याची विनंती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अनेक घरे सुरक्षित राहिली. या बचाव मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, सहायक फायरमन जयेश पवार, सहायक फायरमन प्रणय रसाळ, सहायक फायरमन सुरज शिगवण तसेच वाहन चालक गजानन जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अग्निशमन कर्मचारी तसेच ॲड. वैभव खेडेकर यांच्या तातडीच्या मदत कार्य केल्याबदल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg