दापोली (वार्ताहर) : प्लास्टिक मुक्त दापोली या ध्येयवाक्याला साकार रूप देत जेसीआय दापोली आयोजित जेसीआय चषक २०२६ हा क्रिकेटचा महासंग्राम उत्साह, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम ठरला. तीन दिवसीय या भव्य स्पर्धेचे उद्घाटन दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते तसेच जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी बहुजन हिताय विद्यामंदिर, आगरवायंगणी तसेच रामराजे स्कूल अँड कॉलेज, दापोली यांना सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन प्रदान करून सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
या स्पर्धेत तब्बल १९ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रविवारी झालेल्या रंगतदार अंतिम सामन्यात इमाद पॅकर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर सनी कोंड, दापोली संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ओसामा (इमाद पॅकर्स), सर्वोत्तम फलंदाज ओसामा (इमाद पॅकर्स), सर्वोत्तम गोलंदाज: अमित (सनी कोंड), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक: जतिन साळगावकर (दापोली ११) यांना गौरविण्यात आले.
बक्षीस समारंभास दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाघाग, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर, राजेश घोसाळकर, राहुल राठोड, मिलिंद शेठ तसेच जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, जेसी अतुल गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्लास्टिक मुक्त दापोली, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ, सुंदर दापोली या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.