loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांसह ७ पानशॉपच्या विरुद्ध कारवाई-२६ हजाराचा मुद्देमाल जप्त

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर परवानगी नसताना अन्नपदार्थासह अन्य प्रतिबंधित वस्तू विक्री करणाऱ्या ७ पानशॉपवर ठाणे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई करण्यात अली. या पानशॉपमधून २६ हजार ७०५ रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ हस्तगत करण्यात पथकाला यश लाभले. बऱ्याच काळानंतर ठाणे अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केल्याची एकच चर्चा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी दरम्यान विविध पान शॉपमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. संबंधित साठ्याची एकूण किंमत २६ हजार ७०५ रुपये इतकी असून विविध ब्रँडची पॅकेट्स जप्त करण्यात आली. साठा कोठून आणला, उत्पादक कोण आहे किंवा खरेदी बिल याबाबत विचारणा करूनही विक्रेत्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या १६ जुलै २०२५ च्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने सदरची कारवाई करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

ठाणे अन्न सुरक्षा पथकाने हस्तगत केलेल्या प्रतिबंधित प्रत्येक साठ्यातून प्रातिनिधिक नमुने घेऊन उर्वरित साठा पंचासमक्ष सिलबंद करण्यात आला. या कारवाईत ठाणे स्टेशन परिसरातील स्टार पान शॉप, राजपुरी पान शॉप, आर. के. पान शॉप, किंग पान शॉप, कोहिनूर पान शॉप आदी दुकानांचा समावेश आहे. संबंधित विक्रेते, पुरवठादार व उत्पादकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६(२)(iv), २७(३)(ड), ५९ तसेच कलम ३०(२)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg