loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई-पुणे मिसिंग लिंक 1 मे ला खुला होणार

देवळे (प्रकाश चाळके) - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई - पुणे मिसिंग लिंक १ मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. दूरदृष्टी विकासाची आणि नेतृत्व कार्यशील असले की विकास साध्य होतोच. हे शिंदे साहेबांनी मुंबई - पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने सहजरित्या पेलत तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्याने मुंबई - पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वास येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकल्पामुळे मुंबई - पुणे ३० मिनिटांची बचत होणार आहे. याशिवाय, घाटातील तीव्र वळणे आणि धोकादायक चढ - उतार टाळून सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. तर आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्यातून प्रवासाचा एक सुखद अनुभवही घेता येणार आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नांतून साकारण्यात येत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg