loader
Breaking News
Breaking News
Foto

'भक्तिरंग' स्वराभिषेकाचे आयोजन; नामवंत कलाकारांची मांदियाळी

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - माणगाव येथील श्री दत्त मंदिरात येत्या ३० एप्रिल रोजी 'भक्तिरंग' या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तीसंगीत, नाट्यसंगीत आणि सिनेभक्तीसंगीताची सुश्राव्य पर्वणी श्रोत्यांना मिळणार आहे. ​श्री सेलेस्तीन शिरोडकर आणि मित्र मंडळी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी १२:१५ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमात प्रामुख्याने गायिका राधा जोशी आणि गायन व हार्मोनियमवर प्रसाद शेवडे आपली कला सादर करणार आहेत. त्यांना तपल्याची साथ अभिनव जोशी तर पखवाज साथ विकास नर देणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे-शिरोडकर करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मैफलीत 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे', 'वैष्णव जन तो', 'गणराज रंगी नाचतो', 'देह देवाचे मंदिर', 'आज गोकुळात रंग' आणि 'दर्शन दे रे भगवंता' यांसारख्या अनेक अवीट आणि लोकप्रिय भक्तीगीतांचा समावेश असणार आहे. ​तरी या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सेलेस्तीन शिरोडकर आणि मित्र मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg