loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण देऊळवाडा येथे चालत्या दुचाकीला आग लागल्याने खळबळ

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील देऊळवाडा भागातील रस्त्यावर चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ही घटना दृष्टीपतास पडताच त्याने वेळीच गाडी थांबवून स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझेपर्यंत दुचाकीचे बरेच नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg