दापोली (प्रतिनिधी) - नवसाला पावणारे आणि भक्ताच्या हाकेला सत्वर धावणारा देव म्हणून सर्व दूर ख्याती पावलेल्या आंबवली बुद्रुक येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री काळेश्वरी ग्रामदेवतेचे नव्याने मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरातील श्री काळेश्वरी या मुख्य देवतेच्या मुर्तीसह श्री गिरोबा देवाच्या पादुका तसेच श्री घोडसकरीन आणि श्री फणसकरीन या देवतेच्या नव्याने मूर्ती घडविण्यात आलेल्या आहेत. या नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवतांच्या नव्याने घडविलेल्या मूर्तींची विधीवत पूजाअर्चा करत धार्मिक सोपस्कार पार पाडत मंदिरात देवतांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा भक्तीभावाच्या आनंदात मोठ्या उत्साहात पार पडला. आंबवली ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळेश्वरी मंदिर जिर्णोध्दार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या धार्मिक आनंददायी, भक्तीमय कार्यक्रमाच्या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. त्यात प्रामुख्याने दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांनी आपल्या व्यस्त कामातून उपस्थित रहात ग्रामदेवतेचे दर्शन घेतले.
नाम. कदमांची उपस्थिती ही येथील ग्रामस्थांसह उपस्थितांना चांगलीच सुखावून गेली. त्यामुळे ग्रामस्थांच्या आनंदात आणखीनच भर पडली. मंदिरात केलेल्या लाकडी कामाचे समाधान व्यक्त करताना नाम. कदम म्हणाले लाकडांचा वापर करून कलाकुसरीची कामे असलेली फारशी मंदिरे हल्ली बांधण्यात येत नाहीत मात्र तुम्ही मंडळींनी उत्तम अशा प्रकारचे लाकडी काम करून मंदिराच्या सुशोभीकरणात अधिकची भर घातली आहात. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला समाधान मिळेल अशाप्रकारचा आशावाद व्यक्त करत त्यांनी लाकडी कामांच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, विकास कामात आपण कुठेच कधीही कमी पडलेलो नाही. यापुढे देखील कमी पडणार नाही जी-जी सार्वजनिक हिताची विकास कामे असतील ती-ती मार्गी लावण्याचे आपल्याकडून प्रामाणिकपणे काम केले जाईल, असे त्यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
आंबवली बुद्रुक ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र बंगाल, सचिव सुनील मालप, रितेश तांबे, दिनेश तांबे, दिलिप तांबे, मंगेश घाग, प्रकाश काप, श्रीधर खांबे, अक्षय खाडे, कृष्णा तांबे, रमेश घाग तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र घाग, उपाध्यक्ष मधुकर खा़बे, सचिव संदिप धारजे, राकेश सांबरे, नयन आमडस्कर आदिंसह कार्यकारी मंडळाचे सदस्य त्याचप्रमाणे महिला मंडळ अध्यक्षा चेतना बंगाल, मनस्वी चिलबे, शुभांगी रेवाळे, सुचित्रा मालप आदींसह महिला मंडळाच्या सदस्यांच्या तसेच केळकर बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष संदीप आमडस्कर आणि उद्योजक अनिल तांबे यांच्या हस्ते नाम. योगेशदादा कदम यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आंबवली बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू वजिरकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन दुर्गवले, पंचायत समिती सदस्य संदीप चिखले आदिंसह स्थानिक ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे सदस्य, महिला मंडळाच्या सदस्या तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.






































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.