ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयात मुंब्रा येथे दिवा पश्चिम भागात आणि मुंब्रा परिसरातील नारायण नगर जी.आर. पाटील कॉलेज येथे अज्ञात चोरटयांनी केलेल्या दोन चोऱ्यांमध्ये तक्रारदार अक्षय नरेश घडशी(३०) यांच्या घरातून रोख रक्कमेसह १० लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. तर तक्रारदार सैझी इकबाल अहमद सैफी (२९) याच्या घरातून फर्निचरचे काम करणाऱ्या त्रिकुटाने तब्बल १ लाख ४ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या दोन्ही चोरीच्या प्रकरणाची नोंद २४ एप्रिल, २०२६ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पोलीस अधिक तपसकरीत आहेत.
तक्रारदार अक्षय घडशी(३०) रा. दिवा पश्चिम यांची बहीण नातेवाईकांना सोडण्यासाठी घराला कुलूप लावून २३ एप्रिल रोजी दुपारी २-१७ वाजण्याच्या सुमारास गेली होती. नातेवाईकांना सोडून २-३२ वाजता परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीत अज्ञात चोरट्याने लोखंडी कपात उचकटून त्यात ठेवलेले दागिने, लोकरमधील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख १ हजाराचा मुद्देमाल लांबविला. यात 1 तोळा आणि 3 तोळ्याची दोन मंगळसूत्र, ५ ग्रामची चैन आणि इतर दागिने आणि रोख रक्कम लांबविली. चोरीची दुसरी घटना नारायणनगर, जी.आर. पाटील कालेज जवळ, मुंब्रा येथे घडली.
तक्रारदार सैझीइकबाल अहमद सैफी(२९) यांच्या घरात फर्निचरचे काम ओळखीने सुतार फैजान हसन, फहाद हसन, हमाद हसन रा. कल्याणफाटा सर्कल, सीएनजी पंप जवळ, शिळफाटा यांना दिले होते. ते काम करीत होते. घरात टीव्ही युनिट, दोन कपाट, एक वेड, मास्टर बेडरूमचे एक कपाट बनवायचे होते. या काम दरम्यान सुतार काम करीत असलेल्या तिघांनी घरातील तक्रारदार यांच्या १७ कटर मशीन, यांच्यासह ग्राइंडर आणि इतर साहित्य असावं १ लक्ष ४ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. जेव्हा तक्रारदाराच्या लक्षात येताच तिघांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.