loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री स्वामी समर्थ मठाच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील श्री स्वामी समर्थ मठ व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठाच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच अस्थिरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी ढोल-ताशा स्पर्धा तसेच यापूर्वी तीन ते चार वेळा मेडिकल कॅम्प आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. समाजकार्य म्हणजेच देवाची सेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून यंदा विशेषतः अस्थिरोग तपासणी शिबिर राबविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ आणि श्री स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरासाठी यश मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित राहिले होते. अल्प कालावधीत आणि शॉर्ट नोटीसवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले असूनही खेड शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत या उपक्रमाला यशस्वी केले. नगरसेविका नीता आंब्रे यांनी यावेळी बोलताना, “लोकांची सेवा हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून, असा आगळावेगळा उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे मत व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

यापुढेही श्री स्वामी समर्थ मठ अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत समाजाप्रती आपले दायित्व पार पाडत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसेच सालाबादप्रमाणे उद्या 27 एप्रिल रोजी सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून खेडवासीयांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री स्वामी समर्थ मठ व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी उद्योजक शैलेश धारिया, नगरसेवक सुनील दरेकर, केतन आंब्रे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg