loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बनावट विदेशी मद्याची विक्री करणा-यांवर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी कार्यालयाची धडक कारवाई

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - डॉ.राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे संचालक (अंमल बजावणी दक्षता), विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग, कोल्हापूर अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग कीर्ती शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सन जानेवारी २०२६ ते आतापर्यंत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी या विभागांनी गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री व वहातूक करणा-या इसमांवर ४३ वारस गुन्हे ०३ बेवारस गुन्हे असे एकूण ४६ गुन्हे नोंद करून अं.१५६०१.२३ ब.लि.इ तके गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. तसेच दोन जप्त वहानासह २,०५,३८,४९५ रूपये इतक्या कीमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग यांनी माहीती दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कारवाईमध्ये ऐ.ऐ. पाडाळकर भरारी पथक रत्नागिरी, विभाग निरीक्षक आर.जी.मोरे, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग जी.सी.जाधव, भरारी पथक रत्नागिरी, दुय्यम निरीक्षक सी.एल.कदम, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी क्रमांक तीन सर्व जवान एम एस.पवार, व्हीआर.सोनावले, एन.जे.तुपे, एस.आर टीकार, व्ही.के.भोसले, एस.एस.उबाळे, आर.यु.लोंढे, एन.एन.सुर्वे, महीला जवान श्रीमती घुडे यांनी सहभाग घेतला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg