loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली तालुक्यातील ३ ग्रा.पं.च्या रिक्त जागांसाठी २८ रोजी पोटनिवडणूक

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणारी पोटनिवडणूक मंगळवार २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, स्थानिक प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडणुकीत एकूण ३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी मतदान होणार आहे. याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे घोणसरी येथे थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. या जागेसाठी २ उमेदवार रिंगणात असून, त्यांच्यात थेट लढत होणार आहे. दारिस्ते आणि तळेरे या दोन ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असून, येथे एकूण ४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

टाइम्स स्पेशल

निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येईल. संबंधित ग्रामपंचायतींमधील मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg