loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाकडून नितेश राणेंची निर्दोष मुक्तता

नीतेश राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना मुंबई-गोवा महामार्गावरील चिखल व खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा त्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार यासंबंधी नीतेश राणे यांच्यासह जवळपास 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. पण याच प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात कोर्टाने त्यांना 1 महिन्यांचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली आहे. तरीही या बाबत कायदेशीर प्रक्रिया राणे यांचे वतीने राबविली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रस्तुत प्रकरणात नीतेश राणे यांच्यावर भादंवि कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील कलम 353, 332 व 506 कलमांतर्गत नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका झाली, पण यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नीतेश यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या शिक्षेला स्थगिती देण्याचा अर्ज दाखल केला आहे. याविषयी कोर्टात लवकरच रिव्हिजन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई - गोवा महामार्गावरील चिखल व खड्ड्यांचा जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी गडनदी पुलावर शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. सर्वसामान्य जनता या मार्गावर दररोज चिखलाचा मारा सहन करते. आज तुम्ही तो अनुभवा, असे नीतेश राणे त्यावेळी म्हणाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg