वैभववाडी (प्रतिनिधी) - लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील नावळे व कुर्ली या खोरीतील गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. या दोन गावांसाठी तात्काळ मोबाईल टॉवर मंजूर करण्याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिले. लोरे जिल्हा परिषद मतदार संघात नावळे व कुर्ली ही दोन गावे येतात. खोरेतील या गावांमध्ये तातडीने मोबाईल सुविधा उपलब्ध करून द्यावी. रेंजअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकिय कामकाज तसेच दैनंदिन संवादावर परिणाम होत असल्याचे निवेदनात सुतार यांनी म्हटले आहे.
यावेळी लोरेचे सरपंच विलास नावळे, माजी सरपंच नाना रावराणे, रितेश सुतार तसेच सत्यजित रावराणे उपस्थित होते. या मागणीवर पालकमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.