loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे येथे सकल हिंदू संमेलन संपन्न

देवळे - हिंदू जनजागृती आणि हिंदू संघटन ह्यासाठी प्रयत्न म्हणून देवळे मंडळ अंतर्गत येणार्‍या आठ गावांचे सकल हिंदू संमेलन देवळे येथील श्री खडगेश्वर मंदिरात संपन्न झाले. अमित पंडित यांनी सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर प्रारंभी झालेली मुघल आक्रमणे आणि नंतर झालेली ख्रिश्चन आक्रमणे यांची माहिती दिली. हिंदू धर्म हा धर्मद्वेष मानत नाही तर केवळ कर्तृत्वश्रेष्ठता आणि राष्ट्रभक्ति जाणतो असे ते म्हणाले. हिंदू धर्माला असलेल्या सीमेपलीकडील आणि सिमांतर्गत धोक्यांची जाणीव त्यांनी आपल्या प्रास्ताविकात करून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख वक्ते संतोष जोशी यांनी हिंदू धर्मासमोरील आव्हाने ह्यावर मार्गदर्शन केले. हिंदू हा केवळ एक धर्म नाही तर ती जीवन जगण्याची पद्धती असल्याचे ते म्हणाले. ही सहस्कृती अधिकारापेक्षा कर्तव्यावर भर देते तसेच संत आणि योद्धे यांनी सर्वस्व अर्पण करून ही संस्कृती टिकवली असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव, अतीसहिष्णुता ह्यामुळे ह्या संस्कृतीची अधोगती झाल्याचे ते म्हणाले. डॉ.जयश्री जोग यांनी परकीयांच्या आक्रमणांमुळे आपली कुटुंबव्यवस्था धोक्यात आल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंबातला संवाद संपल्यामुळे ही व्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रकाश चाळके यांनी हिंदू संघटनांची गरज व्यक्त केली. धर्माविषयी एकत्र येण्याची गरज असताना ती अन्य धर्मात पूर्ण होते पण हिंदू धर्मात तिचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली. दिलीप शिर्के यांनी जातीपातींच्या पलीकडे जावून राष्ट्रहिताचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. घाटीवळे, चोरवणे, करंजारी, देवळे, चाफवली, मेघी, कनकाडी, दाभोळे ह्या गावातील ग्रामस्थांनी संमेलनात सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg