loader
Breaking News
Breaking News
Foto

द्या माझे 19,300 रुपये! दगावलेल्या बहिणीचा सांगाडा घेऊन भाऊ बँकेत दाखल

भुवनेश्वर: बँकेचे कठोर नियम, त्यातील क्लिष्टता याला कंटाळून एका गरीब आदिवासी व्यक्तीनं आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत नेला. तुमच्यासाठी पुरावा आणला आहे. आता तरी माझ् १९,३०० रुपये द्या, अशी आर्त मागणी त्यानं केली. त्याला पाहून सगळेच जण स्तब्ध झाले. ही हृदयद्रावक घटना ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केओंझार जिल्ह्यातील पटना ब्लॉकमधील मल्लीपासी येथील ओडिशा ग्रामीण बँकेत एकच खळबळ उडाली. एक आदिवासी व्यक्ती त्याच्या मृत बहिणीचा सांगाचा खांद्यावर घेऊन पोहोचताच बँकेच्या शाखेत गोंधळ झाला. जीतू मुंडा असं आदिवासी व्यक्तीचं नाव आहे. जीतू यांची बहीण कालरा यांचं मल्लीपासी येथील ओडिशा ग्रामीण बँकेत खातं होतं. त्यात १९,३०० रुपये होते. कालरा यांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा पती आणि एकुलता एक मुलगा यापूर्वीच दगावला आहे. त्यामुळे जीतू हेच त्यांचे एकमेव जिवंत नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी जीतू त्यांच्या बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले. त्यावर खातेधारकाला घेऊन या किंवा मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारसदार असल्याचा दाखला घेऊन या, असं उत्तर बँकेच्या शाखा व्यवस्थापकानं दिलं. जीतू यांच्याकडे कोणतीही कागदपत्रं नव्हती. त्यांना यासाठीच्या प्रक्रियेचीदेखील कल्पना नव्हती. त्यामुळे असहाय असलेले जीतू रिकाम्या हातानं घरी परतले.

टाईम्स स्पेशल

जीतू एका गरीब आदिवासी कुटुंबातील आहेत. त्यांच्यासाठी मृत प्रमाणपत्र, वारसदार दाखला तयार करणं अतिशय अवघड आहे. जीतू अशिक्षित आहेत. त्यांना बँकेच्या नियमांचीदेखील फारशी कल्पना नाही. बँक कर्मचाऱ्यांची उत्तरं ऐकून जीतू चिंतेत सापडले. जीतू यांनी सोमवारी स्मशान गाठलं. बहिणीची कबर खणून त्यांनी अवशेष बाहेर काढले. सांगाडा एका कापडात गुंडाळला. त्यानंतर तो सांगाडा खांद्यावर ठेवून ३ किलोमीटर अंतर पायी कापून बँकेची शाखा गाठली. रणरणत्या उन्हात जीतू चालत होते. जीतू यांनी बँकेच्या बाहेर सांगाडा घेऊन उभे राहिले. तेव्हा त्यांना पाहणारे सगळेच स्तब्ध झाले. अनेकांना संताप अनावर झाला. त्यांनी बँक प्रशासनाला धारेवर धरलं. बँकेनं गावच्या सरपंचांचं पत्र आणायला सांगायला हवं होतं, जीतू यांच्या घरी जाऊन पडताळणी करायला होती, माणुसकीच्या आधारावर निर्णय घ्यायला हवा होता, अशा शब्दांत ग्राहकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुनावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस बँकेत दाखल झाले. त्यांनी जीतू यांना समजावलं आणि शांत केलं. या प्रकरणात माणसुकीच्या भावनेतून लक्ष घालण्यात येईल, असा शब्द अधिकाऱ्यांनी जीतू यांना दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg