loader
Breaking News
Breaking News
Foto

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, लांजा तहसीलदारांना निवेदन सादर

लांजा (संजय साळवी) - गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी गो सन्मान अभियानांतर्गत लांजातील हिंदू बांधवांच्यावतीने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करण्यात आले. संपूर्ण देशभरात आज सोमवारी २७ एप्रिल रोजी गो सन्मान अभियानांतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेचे संरक्षण व्हावे, गोमातेचे संरक्षण होण्यासाठी संशोधन व्हावे आणि गोपालन होण्यासाठी गोपालन मंत्रालय व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन सादर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजकाल अनेकदा आपल्याला गोहत्येच्या बातम्या वाचनात येतात. हिंदू धर्मात गोमाता ही पूजनीय असून ३३ कोटी देवांचा त्या ठिकाणी वास आहे. भगवान श्रीकृष्णाचे वर्णन देखील गोपाळ म्हणून केले जाते. अशी ही पूजनीय गोमाता आज रस्त्यारस्त्यावर भटकते आहे. म्हणूनच गोमातेचे संरक्षण व्हावे, तिला राजम राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या अनुषंगाने संपूर्ण देशभरात हे अभियान टप्प्याटप्प्यात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी लांजा शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg