loader
Breaking News
Breaking News
Foto

पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयांतर्गत आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेतील इयत्ता ७ वी मधील कु. हेरंभ नाटेकर , इयत्ता ४ थी मधील कु. श्रीहान मुंज, इयत्ता ५ वी मधील कु. वरद सावंत, कु. केवल मांद्रेकर, कु. कुशल तांडेल या सहभागी पाचही विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि त्यांना लाभलेले शिक्षक संकेत म्हापणकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg