loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी-काळबादेवी बस सेवा बंद; ग्रामस्थांचे हाल, १ मे पासून उपोषणाचा इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी आगारातून सुटणाऱ्या रत्नागिरी-काळबादेवी मार्गावरील काही शहरी बस फेऱ्या गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. या बस सेवा पूर्ववत न झाल्यास १ मे २०२४ (महाराष्ट्र दिन) पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा काळबादेवीचे शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काळबादेवी गावात सुमारे १२ वाड्या असून २००० हून अधिक लोकवस्ती आहे. येथील बहुतांश नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग दैनंदिन कामासाठी रत्नागिरी शहरावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सकाळी १०:२५ आणि दुपारी १:२५ ची बस सेवा बंद आहे. विशेष म्हणजे, गेल्या ३-४ महिन्यांपासून सकाळी ८:०५ ची महत्त्वाची बस फेरी देखील बंद ठेवण्यात आली आहे. ​ ​सध्या रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, बस वेळेत उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. स्वतःचे वाहन नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नाइलाजास्तव खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून, यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

टाईम्स स्पेशल

​याबाबत काळबादेवी शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप यांनी शहर बसस्थानक प्रमुखांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार रत्नागिरी-काळबादेवी दरम्यानच्या शिरगाव, आडी, कासारवेली आणि बसणी भागातील प्रवाशांनाही या बसचा मोठा आधार होता. ​वारंवार मागणी करूनही बस सेवा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. निवेदन दिल्यापासून पुढील ४ दिवसांत बस सेवा सुरू न झाल्यास, संदेश बनप १ मे पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg