पनवेल :- सन २०२३ साली संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पनवेल काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून राजकीय फायद्यासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला. “दि. १६ आणि १७ एप्रिल रोजी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. त्यावेळी महिला आरक्षणाचे बिल असल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ते डिलिमिटेशनशी जोडलेले बिल होते. काही राज्यांमध्ये निवडणुकीत फायदा व्हावा आणि भाजप कायम सत्तेत राहावी, या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, “जर सरकारला महिला आरक्षण खरोखरच लागू करायचे होते, तर २०२३ मध्ये मंजूर झालेले विधेयक २०२४ पासून लागू करता आले असते. मात्र तसे झाले नाही. आमची मागणी आहे की २०२६ ची जनगणना तातडीने करावी आणि त्यानुसार आरक्षण लागू करावे. तसेच एससी आणि एसटी महिलांप्रमाणेच ओबीसी महिलांनाही प्रतिनिधित्व द्यावे. आमच्या या मागण्या मान्य झाल्यास आम्ही या विधेयकाला पूर्ण समर्थन देऊ.” सरकारवर टीका करताना त्यांनी “हे सरकार फसवे असून महिलांना केवळ आश्वासने देत आहे,” असा घणाघात केला.
यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका लीला कातकरी, कार्याध्यक्ष शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे, शैलेश पाटणे, अमित दवे, सुरेश पाटील, अरुण कुंभार, प्रितेश साहू, हेमराज म्हात्रे, आरती ठाकूर, सुदेशना रायते, जयश्री खटकले, दीपा ढोले, चेतन म्हात्रे, बबन केणी, जयवंत देशमुख, अखिल अधिकारी, शाहीद मुल्ला, स्वराज पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. धिरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जोरदार घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच धिरेंद्र शास्त्री यांचे छायाचित्र पायदळी तुडवत निषेध नोंदविण्यात आला.

















.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.