loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मद्य विक्री करणार्‍या तिघांवर कारवाई

लांजा (सिराज नेवरेकर) - राजापूर शहरातील चालू असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मद्याची विक्री करणार्‍या तिघां इसमांविरुध्द राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी कार्यालयाकडून कडक कारवाई करून ९७,२६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राजापूर शहरात गोवा बनावटीची मद्याची विक्री करणार्‍या मंगेश गणपत दुधवडकर वर्ष (५५), रा. धोपेश्वर घाटी आणि रमेश डंबे वर्ष (४२) रहाणार राजापूर दिवटेवाडी व सुरज संतोष पाटील, वय वर्ष (२६) रा. नाटेकर बांधरकर वाडी तालुका राजापूर यांचेवर कडक कारवाई केली असुन त्यांच्या ताब्यातील असलेला गोवा बनावटीची दारूचा ९७२६०रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे. सदरची कारवाई अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग कीर्ती शेडगे यांचेमार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.जी.मोरे, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग दुय्यम निबंधक सी.एल कदम यांनी कारवाई केली. कारवाईमध्ये जवान एस.उबाळे, आर.यु.लोंढे, एन.एन सुर्वे, श्रीमती एस.ए.घुडे यांनी सहभाग घेतला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg