loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप खेड जनता दरबारला प्रचंड प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) - भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथील शासकीय विश्रामगृहमध्ये आज ‘जनता दरबार’ संपन्न झाला. आपल्या खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्या अडचणी राज्य शासनापर्यंत पोहोचाव्यात, याच उदात्त हेतूने हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. कारण, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, हेच माझा उद्दिष्ट आहे. तसेच या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न होता. यापुढेही असे उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपला विश्वास, आपले प्रेम आणि आपला पाठिंबा याच बळावर जनसेवेचा हा प्रवास पुढेही अधिक जबाबदारीने सुरू ठेवणार, असे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा सोशल प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता, तसेच खेड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg