loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली वळणे येथे अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त

दापोली (वार्ताहर) : दापोली दाभोळ मार्गांवरील वळणे येथे एका कारमधून दापोली पोलिसांनी सुमारे २ लाख ४० हजार किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला असून ५ लाख किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली दाभोळ मार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच दापोली पोलिसांच्या पथकाने काल ता. २७ रोजी सायंकाळी ६ वाजणेचे सुमारास दाभोळ मार्गांवर शोध मोहीम राबविली असता या मार्गांवरील वळणे येथील एका हॉटेल समोर एक कार क्रमांक एम एच.०८.-बीई.-८०१९ उभी असलेली पोलिसांना दिसली. या कारची तपासणी केली असता या पथकाला त्यात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला. त्यात गुटखा व पानमसाला यांची प्रत्येकी ९ हजार ६०० पाकिटे आढळून आली. पोलीस पथकाने पंचनामा करून हा मुद्देमाल व कार ताब्यात घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रकरणी कारचालक आनंदा नागप्पा पुजारी, वय ३६, रा. खेड चिपळूण यास ताब्यात घेण्यात आले व त्याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २३१,२७५,२७४,२२३ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६चे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, हेमराज निर्मळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, हेड कॉन्स्टेबल राजू मोहिते, स्वप्नील शिवलकर सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg