loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे हायस्कूलचे विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळेच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये देवळे हायस्कूलचचे दोन विद्यार्थी कुमारी समीक्षा बोडेकर व कु. अर्णव गार्डी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. गुणवत्ता यादीत आल्यामुळे त्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था चालक , पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कुमारी समीक्षा बोडेकर ही विद्यार्थिनी इस्रो नासासाठी पात्र ठरली होती व ती नासामध्ये जाऊन ही आली आहे. शाळेने परंपरा कायम राखत एन एम एम एस गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्यामुळे पंचक्रोशीत विद्यार्थी व शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg