ठाणे (प्रतिनिधी) - नाशिकच्या एका भामट्याने राज्याच्या विविध भागातील ७ बेरोजगारांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांवर नोकरी लावण्यासाठी ४६ लाख रूपये उकळले. त्यानंतर नोकरी नाहीच, घेतलेले पैसेही परत न केल्याने फसवणूक झालेल्या एका नोकरदार महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सुषमा प्रमोद सिंग असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांची डोंबिवली जवळील पलावा खोणी भागातील एका गृहसंकुलात सदनिका आहे. जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत तक्रारदार सिंग यांच्या सदनिकेत संशयित संजय सतिश वानखेडे हे भाड्याने राहत होते. या कालावधीत संजय वानखेडे यांनी तक्रारदार महिलेला आपण मंत्रालय विधानभवनात काम पाहतो. मंत्रालयात आपली ओळख आहे. आपली अनेक मंत्र्यांशी परिचय आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच आपण शासकीय नोकरी लावण्याचे काम करतो.
या ओळखीतून आपणा यापूर्वी अनेक जणांना शासकीय नोकरीत लावले आहे. काही तरूणांना शासकीय नोकरी लावल्याची नियुक्ती पत्रे संशयित वानखेडे यांनी तक्रारदार सिंग यांना दाखवली होती. असे दोन महिलांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई, टंकलेखक पदावर नोकर भरती आहे. तेथे आपले कोणी नातेवाईक नोकरीला लावायचे असेल तर सांगा आपण ते काम करून देतो, असा विश्वास संशयित वानखेडे यांनी सिंग यांना दिला. या नोकरीसाठी एका उमेदवारासाठी १५ लाख रूपये लागतील असे सांगितले. आपला परिचय असल्याने सिंग यांच्याकडून प्रत्येक उमेदवाराकडून १२ लाख रूपये घेण्याचे संशयित वानखेडे यांनी सांगितले. नोकरीचे नियुक्त पत्र मिळण्यापूर्वी ७ लाख रूपये देण्याची मागणी वानखेडे यांनी केली. या बोलण्यावर विश्वास ठेऊन सिंग यांनी आपल्या नातेवाईक गोतावळ्यातील सपना काळे (कुर्ला), विनोद साबळे (कुर्ला), प्रेम शेषवरे, सुशांत पवार (सांगली), विजय मोरे (बेलापूर) यांना नोकरीला लावण्यासाठी पुढाकार घेतला. या उमेदवारांचे एकूण ७ लाखाप्रमाणे ३५ लाख २५ हजार रूपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले.
संशयित वानखेडे यांनी बनावट नियुक्ती पत्र तयार करून ती उमेदवारांना दाखवली. तुमची शासकीय वैद्यकीय तपासणी होईल. मग तुम्हाला हजर करून घेतले जाईल, अशी कारणे संशयित वानखेडे सांगू लागले. सपना काळे यांना अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात हजर होण्याचे नियुक्त पत्र वानखेडे यांनी दिले. ते बनावट असल्याचे सिंग यांना समजले. त्यानंतर विविध कारणे देऊन वानखेडे आपण आता पलावा खोणी येथे राहत नाही. आपली पालघर येथे बदली झाली आहे अशी कारणे देऊन तक्रारदार सिंग यांना टाळू लागले. तुम्ही नोकरी देणार नसाल तर आमचे पैसे परत करा, असा तगादा तक्रारदाराने लावला. वानखेडे यांनी ३६ लाखाचे धनादेश सिंग यांना दिले. ते बँकेत वटले नाहीत. या रकमेतील ३ लाखाची रक्कम वानखेडे यांनी परत केली.




























.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.