मालवण (प्रतिनिधी) - नगरपालिकेमध्ये मालवण गेली २५ वर्ष अविरतपणे सेवा बजावणारे, कंत्राटी कर्मचारी असूनही कायम असल्याप्रमाणे जनतेच्या सेवेत कार्यरत असणारे, मालवण बाजारपेठेतील कासारव्हाळी येथील रहिवासी सुनील शांतीनाथ गरगटे (वय ५२) यांचे गोवा बांबोळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. नगरपालिका आरोग्य विभाग आणि त्यात करून स्वच्छतेचे व्रत हाती घेऊन सदैव लोकांत राहणारे आणि लोकांसाठी मिळेल ते सहकार्य करणारे सुनील गरगटे सगळ्यांच्या परिचित असणारे व्यक्तिमत्त्व होते. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. आपल्या वाड्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमीच अंगमेहनतीसाठी सज्ज असत.
कचरागाडी, अग्निशामक बंब आणि आता सक्शन वाहन अशा नगरपालिकेच्या परिवारातच या ना त्या गाडीवर सतत दिसणारे आणि कमी बोलून आपले काम चोख बजावणारे सुनील यांचे कार्य सर्वांना आपलेसे वाटणारे होते. नगरपालिकेच्या प्रवाहात कंत्राटी असूनही गरज भासेल त्या-त्या ठिकाणी ते सदैव हजर राहून आपली भूमिका निभावताना दिसून येत. लोकप्रतिनिधींशी आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी मिळतेजुळते घेऊन आपली अविरत सेवा करताना ते दिसत होते. काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर गोवा-बांबोळी याठिकाणी उपचार सुरू होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी बाजारपेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.


































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.