loader
Breaking News
Breaking News
Foto

यु-टूबर गजाआड-सायबर पोलिसांची कामगिरी

ठाणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर येताच शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी ठाणे सायबर सेल पोलीस ठाण्यात १६ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. अज्ञात युटूबर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास करीत पोलिसांनी यूट्यूबरला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावानिशी Avesh News80 या युट्युब चॅनेलवर वादग्रस्त खरात प्रकरणाशी संबंध जोडीत खालच्या पातळीवर टीका केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेना नगरसेवक रेपाळे यांनी ठाणे सायबर पोलीस ठाण्यात यूट्युबर याच्या विरोधात तक्रार नोंदविली.

टाइम्स स्पेशल

संवेदनशील तक्रारीचा गंभीरतेने तांत्रिक अभ्यास करून यावर सदर आक्षेपार्ह बातमी पोस्ट करण्यात आलेली असल्याचे तपासून ठाणे सायबर पोलिसांनी युट्युबर याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सायबर पोलीस युट्युबरकडून अधिक चौकशी करीत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg