loader
Breaking News
Breaking News
Foto

कोयतीने हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

खेड (वार्ताहर) : खेड येथील जिल्हा न्यायालयाने भेलसई तालुका खेड येथील विजय कदम यांच्यासह ६ जणांची खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. विजय कदम यांच्यासह सहा जणांवर संगनमताने कोयतीचे वार करून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या कामी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जखमी झालेल्या भरत भिंगारे, अशोक महादेव कदम जखमी, अनिता अशोक कदम यांच्यासह साक्षी संतोष मोरे, तसेच मेडिकल ऑफिसर डेरवण हॉस्पिटल व तपासीक अंमलदार आदींचा समावेश होता. जखमी साक्षीदार अशोक कदम यांनी सांगितले की आरोपी अभिजीत याने कोयती माझ्या डोक्यात मारून मोठी जखम केली. त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो, मला डेरवण येथे प्रथम देण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी येथे हलवण्यात आले. तसेच आरोपी विजय यांनी काठीने माझ्या पत्नीला व मला मारले, असे सांगितले. त्यांची पत्नी अनिता यांनी साक्षीमध्ये सांगितले की माझ्या पतीवर अभिजीत ने कोयतीने हल्ला केला, तसेच विजय संभाजी कदम याने काठीने त्यांच्यावर हल्ला केला. मला देखील दोघांनी मारहाण केली. माझ्या पतीला डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना डेरवण हॉस्पिटलला दाखल केले. त्यानंतर त्यांना गंभीर परिस्थिती असल्यामुळे रत्नागिरी येथे नेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व साक्षीदारांचे उलट तपास अ‍ॅड. सुधीर शरद बुटाला यांनी घेतले. उलट तपासामध्ये त्यांनी कोयती नेमकी कोणाकडे होती, तसेच नेमक्या कोणत्या दुखापती झाल्या. याबाबत तपासात विसंगती असल्याचे न्यायालयासमोर आणले. तसेच त्याच दिवशी आरोपी पक्षाच्या घरी पाहुणे येणार होते. त्यामुळेच फिर्यादींनी हा खोटा खटला केला आहे, असाही बचाव आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. एकंदर झालेल्या साक्षी पुरावा, अ‍ॅड. सुधीर शरद बुटाला यांचा युक्तिवाद, विविध उच्च न्यायालयांचे दाखल केलेले निकाल, या सर्वाचा विचार करून जिल्हा न्यायाधीश यांनी सर्व आरोपींची निर्दोष केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg