loader
Breaking News
Breaking News
Foto

आक्वा टेक्निक्स अकॅडमीची महा स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

रत्नागिरी - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे महा स्विमिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी येथील आक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीच्या सात जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 7 सुवर्ण, 5 रजत आणि 3 कांस्य पदके पटकावली आणि रत्नागिरीचे नाव अभिमानाने उंचावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पदक विजेत्यांची कामगिरी : 1) क्रिशांग अमोल पखाले (Under 12) - 100m Butterfly – सुवर्ण, 50m Butterfly – सुवर्ण, 100m Freestyle – रजत, Mixed Relay (4×50m) – सुवर्ण. 2) आरना अमन देओळेकर (Under 6)- Backstroke – सुवर्ण, Butterfly – सुवर्ण, Freestyle – कांस्य. 3) रुद्र परेश सरफरे (Under 12)- 200m Individual Medley – रजत, 100m Bifins Freestyle – रजत, Mixed Relay (4×50m) – सुवर्ण. 4) जतिन किशोर भोसले (Under 12)- 100m Breaststroke – सुवर्ण, 50m Breaststroke – कांस्य, 100m Backstroke – रजत, Mixed Relay (4×50m) – रजत.

टाईम्स स्पेशल

आज्ञा शिंदे, रुद्र लाड आणि रेवा कोसुम्बकर यांनी देखील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत अकॅडमीच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या सर्व जलतरणपटूंना आक्वा टेक्निक्स, रत्नागिरी येथील प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे दर्जेदार प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मक कामगिरी सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg