loader
Breaking News
Breaking News
Foto

पाण्यासाठी उमरे धरणावरील अवलंबून असलेली दहा गlवे आजपासून तहानलेली

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील उमरे धरणातील पाणी आटल्याने परिसरातील दहा गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. उमरे धरणाला तीन वर्षापुर्वी गळती लागल्याने या धरणावर अवलंबुन असलेल्या दहा गावाना मार्चपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. मार्च पासून एक ते दोन दिवसाड पाणी पुरवठा सुरु होता. मात्र आज या धरणातील पुर्ण पाणी साठा संपल्याने आजपासून या परिसरातील दहा गावाना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देवरुख यांनी अचानक काल संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयाना उदयपासून पाणी येणार नसल्याचे कळवल्याने आता अचानक पाण्याची काय व्यवस्था करायची हा प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाला पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंबंधी या सरपंचानी पंचायत समिती देवरुख कार्यालयाला कळवले असता तालुक्याला एकच टँकर असल्याचे सांगितले. पुर्ण तालुक्याला एका टँकरणे पाणी पुरवठा कसा होणार? आणि येथील दहा गावाना पाणी कसे पुरावायचे हा एक्ष प्रश्न प्रत्येक सरपंचांना पडला आहे. गेली तीन वर्ष येथील धरण लिकेज असुन यातील पाणीसाठा 50% कमी केला आहे. पाण्या सारखी गंभीर समस्या असताना लोक प्रतिनिधी आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासना विरोधात संतापाची लाट पसरली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg