loader
Breaking News
Breaking News
Foto

झरे-२ येथे रस्त्यासाठी १ मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील झरे-२ येथील ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांनी गावाकडे जाणारा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी १ मे २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, झरे-२ येथील नागरिकांनी यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून सक्तीची मोजणी करून रस्ता खुला करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत रस्ता खुला करण्यात आलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा जवळ येत असताना रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी खुला होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे, १५ एप्रिल २०२६ पर्यंत रस्ता खुला न झाल्यास १ मे रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय झरे-२ येथे बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. या उपोषणात जॉन फ्रान्सिस डिसोझा, कैतान अँटोन डिसोझा, मॅकलॉईड डायगो डिसोझा, विल्सन डिसोझा यांच्यासह इतर ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून रस्ता खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg