loader
Breaking News
Breaking News
Foto

जयगड बंदरात आलेल्या अमीर गॅसवाहू जहाजाची चौकशी सुरू

रत्नागिरी : जयगड बंदराजवळ आलेल्या अमीर गॅसवाहू जहाजासह कॅप्टनची कस्टम व सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरु असून, कागदपत्रांमध्ये काही संशयास्पद आढळल्यास कारवाई केली जाईल अशी भूमिका सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी व्यक्त केली. गेले तीनचार दिवस जयगड बंदराजवळ आलेल्या अमीर या गॅस वाहू जहाजाबाबत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. या जहाजावरील कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरक्षा यंत्रणांनी सुरु केली आहे. ओमानवरून जयगड बंदरासाठी निघालेले 1800 मेट्रिक टन एलपीजी गॅसने भरलेले हे जहाज सध्या किनाऱ्यापासून समुद्रात उभे होते. या जहाजाच्या प्रवेशावरून मोठी खळबळ उडाली असली, तरी त्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आणि रंजक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जहाजाचे दोन मालक असून, त्यापैकी एकाला हा गॅस भारतात पाठवायचा आहे, तर दुसऱ्या मालकाचा ओढा जहाज पाकिस्तानला नेण्याकडे आहे. मालकांच्या या भारत विरूद्ध पाकिस्तान धोरणामुळे हे जहाज समुद्रातच नांगर टाकून उभे आहे. साधारणपणे तांत्रिक बिघाड किंवा हवामानामुळे जहाजे थांबवली जातात, पण या प्रकरणाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ओमनहून निघालेले हे जहाज जयगड बंदरात दाखल होणार होते, परंतु ऐनवेळी दोन मालकांमधील अंतर्गत वाद उफाळून आला. एका मालकाच्या मते हा व्यवहार भारतीय बाजारपेठेसाठी झाला आहे, तर दुसरा मालक हा गॅस पाकिस्तानच्या दिशेने वळवण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाचा थेट परिणाम जहाजाच्या कायदेशीर कागदपत्रांवर झाला आहे. बंदरात प्रवेश करण्यासाठी आणि मालाची उतरवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे या मालकी हक्काच्या वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. बंदर प्रशासनाने या प्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे नियमानुसार या जहाजाला जयगड बंदरात प्रवेश नाकारण्यात आला होता. कस्टम विभागाने जहाजावरील कॅप्टनची चौकशी सुरु करुन कागदपत्राची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. गेले तीन दिवस कॅप्टनची चौकशी सुरु आहे. अजूनपर्यंत संशयास्पद असे कोणतेही धागेदारे तपास यंत्रणांना मिळालेले नाहीत. कागदपत्रे व अन्य काही संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर भारतीय सीमा शुल्क विभागाच्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे संदीप कृष्णा यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg