लांजा (वार्ताहर) - शहरातील भटवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त बँक कर्मचारी सुधाकर केशव सावंत यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६९ वर्षांचे होते. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा भटवाडी येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी सुधाकर सावंत हे नेहमीप्रमाणे मंगळवारी २८ रोजी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास चालावयाला गेले होते. त्यांच्या घरापासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भटवाडी जिल्हा परिषद शाळेजवळ ते गेले असता अचानक त्यांना चक्कर येवून ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या अन्य लोकांनी त्यांना प्रथम शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मृत म्हणून घोषित केले. दरम्यान, या घटनेची खबर त्यांचा मुलगा साईप्रसाद सुधाकर सावंत यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. राजेंद्र कांबळे हे करत आहेत.





































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.