loader
Breaking News
Breaking News
Foto

पतंजली योग समितीचे सावंतवाडीत तीन दिवसीय विनामूल्य योग शिबिर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील पतंजली योग समितीच्या वतीने शहरात तीन दिवसीय विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न होणार असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीने केले आहे. हे शिबिर १ मे ते ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६ ते ७:३० या वेळेत विठ्ठल मंदिर येथे पार पडणार आहे. या तीन दिवसीय वर्गामध्ये प्राणायामाचे सर्व प्रकार, सूक्ष्म व्यायाम आणि सोपी योगासने शिकविली जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या धावपळीच्या जीवनात उद्भवणारे विविध शारीरिक त्रास, जसे की हाता-पायांचे दुखणे, कंबरेचा त्रास आणि मधुमेह यांसारख्या आजारांतून मुक्तता मिळवण्यासाठी योगाभ्यासाचा कसा वापर करावा, याचे विशेष मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. शिबिराचे मार्गदर्शक म्हणून विकास गोवेकर तिन्ही दिवस उपस्थित राहून साधकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्राणायामानंतर 'अनुभव कथन' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये साधक आपले अनुभव व्यक्त करू शकतील. ​या शिबिराचा लाभ सर्व गरजू व्यक्तींनी आणि इच्छुक साधकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पतंजली योग समितीचे अध्यक्ष बाबली गवंडे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg