खेड - खेड तालुक्यातील गुणदे गावात “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानाअंतर्गत उपकेंद्र गुणदे यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्य जनजागृतीला प्रतिसाद दिला. या उपक्रमाला सरपंच रवींद्र आंब्रे, पोलीस पाटील रामचंद्र पवार, आरोग्य सेवक दिनेश वासुदेव कदम, आरोग्य सेविका श्रीमती म्हापदी, आशाताई तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रभात फेरीदरम्यान गावातील विविध भागातून फेरी काढण्यात येऊन नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि रोगप्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“स्वच्छ गाव, निरोगी गाव” हा संदेश देत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवणे, तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. या वेळी नागरिकांनीही आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रभात फेरीमुळे गावात आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळणार आहे.








































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.