संगमेश्वर (प्रतिनिधी) - लांजा येथील कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या युवकाला सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने संगमेश्वर येथील बस स्थानकाजवळ बोलावून सोन्याचे बनावट दागिने देऊन साडेतीन लाखाची फसवणूक केली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेश प्रकाश गुजर, राहणार बेनी खुर्द गुजरवाडी, तालुका लांजा यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेश प्रकाश गुजर हे २० एप्रिल रोजी लांजा येथे यंग लूक कपड्याचे दुकानात कामाला असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दुकानात येऊन आमच्याकडे काही सोने आहे ते आमच्या गावाकडे लग्न आहे त्या आर्थिक अडचणीमुळे ते विकायचे आहेत असे सांगून त्यांच्याकडील जोंधळी मणी सोन्याचे दागिने दाखवून त्यांनी त्याच्याकडील असलेल्या जोंधळी मनी दागिन्यातील तारे गुंफलेले दोन-तीन मनी दिले याची खात्री केल्यानंतर साडेतीन लाख किमतीचे दागिने खरेदी करण्याचा व्यवहार झाला.
या व्यवहाराप्रमाणे दोन अज्ञात इसम दागिने देण्यासाठी संगमेश्वर एसटी स्टँड येथे येण्यास सांगितल्याने २८ एप्रिल रोजी जोंधळी मणी सोन्याचे तारेत गुंतवलेल्या हारासारखे दागिने हे सोने खरे आहे, असे सांगत साडेतीन लाखाची फसवणूक केली, असल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, संगमेश्वर पोलीस ठाणे करीत आहेत.








































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.