loader
Breaking News
Breaking News
Foto

भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली लोखंडे

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील भडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या तिरंगी लढतीत सरपंचपदी वृषाली रवींद्र लोखंडे या अवघ्या सात मतांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मयुरी प्रमोद आडविलकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमधील एकूण २३ जागांपैकी ९ जागा बिनविरोध तर १० जागा पुन्हा एकदा रिक्त राहिल्या आहेत. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी आणि भडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या १३ ग्रामपंचायतींपैकी वेरळ, शिरवली, आगवे, पुनस आणि कोर्ले या पाच ग्रामपंचायतीमधील ९ ग्रामपंचायत सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकी पूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर कुरचुंब, वाघ्रट, बेनी खुर्द, आगवे, खावडी, कोट आणि वेरवली खुर्द या ७ ग्रामपंचायतमधील १० ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा पुन्हा एकदा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपद आणि चार ग्रामपंचायत सदस्य अशा पाच जागांसाठी मंगळवारी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतदान झालेल्या भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्य पदांचा निकाल बुधवारी २९ एप्रिल रोजी सकाळी लांजा तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. सरपंच पदासाठी तिरंगी लढत होवून यामध्ये वृषाली रवींद्र लोखंडे या १९१ मते घेत विजय झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मयुरी प्रमोद आडविलकर यांना १८५ मते मिळाली. तर दिया रुपेश रेवाळे यांना १३८ मते मिळाली आहेत. तसेच नोटाला २१ मते मिळाली आहेत.

टाइम्स स्पेशल

त्याचप्रमाणे भडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील चार जागांसाठी पोटनिवडणुक झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून संजीवकुमार भरत राऊत ११७ मते घेत विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय वासुदेव रेवाळे यांना १०१ मते आणि संजय जनार्दन सुर्वे यांना ६४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ मधून सोनाली सुजय दळवी या १४८ मते घेत विजयी झाल्या आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रसिका राजेश मयेकर यांना १३५ मते मिळाली आहेत. तसेच पूजा प्रकाश गीतये यांना ११३ मते आणि मयुरी ओमकार घाणेकर यांना १११ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून पूजा प्रकाश गीतये या ८७ मते घेत विजयी झाल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्वाती सुधीर पाटील यांना २५ मते मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg