loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीसमर्थ विद्यापीठ सातारा मार्फत घेण्यात आलेल्या प्रथमा व द्वितीया परीक्षेत रोटरी स्कूलचे विद्यार्थी अव्वल

खेड (प्रतिनिधी) - श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्रीसमर्थ विद्यापीठ सातारा यांच्या मार्फत सन 2025-26 या वर्षी घेण्यात आलेल्या प्रथमा व द्वितीया परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. सदरची परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त यावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, आचार-विचारांची देवाणघेवाण करता यावी, जिज्ञासा वाढावी, हस्ताक्षर सुधारावे या हेतूने आयोजित करण्यात येते. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेवून गुणांचा उच्चांक गाठून श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, संचलित श्रीसमर्थ विद्यापीठ सातारामध्ये आपल्या व प्रशालेच्या नावाचा ठसा उमटविला आहे. सदर परीक्षेकरिता 38 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये प्रथमा व द्वितीया परीक्षेमध्ये प्रशालेतील 6 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथमा श्रेणी परीक्षेमध्ये कार्तिका जितेंद्र घाग (96 गुण) हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक तसेच सार्थक सागर खेडेकर (95 गुण) याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक आणि सांची धीरज शेठ (90 गुण) याने तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक पटकावले. त्याचबरोबर द्वितीया श्रेणी परीक्षेमध्ये प्रशिक राजेंद्र तांबे (97 गुण) यानेे प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक तसेच रिदान प्रितम पाटणे (92 गुण) यानेे द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक आणि आयुष विक्रांत पाटील (91 गुण) याने तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देवून गौरविण्यात आले. वरील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

प्रथमा व द्वितीय परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका छाया भोजने, प्रिया चिले, स्वरा शिरीषकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg